Uncategorized

बार्टी व एमसीईडीमार्फत विरारच्या विवा कॉलेजमध्ये तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

बार्टी व एमसीईडीमार्फत विरारच्या विवा कॉलेजमध्ये तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन


वसई (प्रतिनिधी) : Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (बार्टी), पुणे आणि Maharashtra Centre for Entrepreneurship Development पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच VIVA College यांच्या विशेष सहकार्याने आयोजित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार (दि. ६ मार्च २०२६) रोजी विरार येथे संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत एक महिन्याचा डिजिटल फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग तसेच दोन महिन्यांचा अप्लाईड डेटा सायन्स अ‍ॅनालिटिक्स या दोन अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात B. R. Ambedkar यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
बार्टीचे प्रकल्प अधिकारी विलास साबळे आणि विवा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. दिपा वर्मा यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. वर्मा यांनी सांगितले की, आजची युवा पिढी अत्यंत दक्ष आणि बुद्धिमान आहे. त्यांना अशा प्रकारचे आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ शकतो. विवा कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांनी बार्टी व एमसीईडीचे आभार मानले.
एमसीईडी पालघरचे प्रकल्प अधिकारी धम्मपाल थोरात यांनी प्रस्तावनेत प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट करताना आजच्या काळात तांत्रिक कौशल्याचे महत्त्व अधोरेखित केले. तर बार्टीचे प्रकल्प अधिकारी विलास साबळे यांनी बार्टीच्या विविध उपक्रमांची माहिती देत प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवा कॉलेजच्या विभागप्रमुख डॉ. स्नेहा मोरे यांनी केले तर वैशाली ढेपे यांनी आभार प्रदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींना तांत्रिक कौशल्य देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे हा आहे. प्रशिक्षणामध्ये संबंधित विषयांचे प्रात्यक्षिक ज्ञान, उद्योग उभारणी प्रक्रिया, शासकीय कर्ज व अनुदान योजना, प्रकल्प अहवाल तयार करणे, विक्री कौशल्य, उद्योग व्यवस्थापन, कर कायदे व परवाने याबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.
सदर प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात आली असून दोन्ही प्रशिक्षणांमध्ये प्रत्येकी ३० असे एकूण ६० लाभार्थी सहभागी झाले आहेत. प्रशिक्षणानंतर पुढील दोन वर्षे एमसीईडीमार्फत उद्योग उभारणी व स्वयंरोजगारासाठी मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास विवा कॉलेजचे IQAC समन्वयक डॉ. रोहन गावनकर, तांत्रिक प्रशिक्षक श्वेता येंदे व शाहीन, बार्टी समतादूत अंजना देवकांत आणि जयश्री चौधरी, प्रशिक्षण समन्वयक सचिन माळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button