Uncategorized

भगिनी समाज शाळेत महिला दिनानिमित्त मुलींच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

भगिनी समाज शाळेत महिला दिनानिमित्त मुलींच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात


पालघर :(प्रतिनिधी) ‘जागतिक महिला दिना’निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शाळा स् डीतरावर मुलींसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पालघर येथील भगिनी समाज संस्था संचलित प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेत शनिवार, दि. ७ मार्च रोजी मुलींच्या विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धांमध्ये १०० मीटर धावणे, कबड्डी, खो-खो, कराटे तसेच लंगडी अशा विविध खेळांचा समावेश करण्यात आला होता. स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मुलींनी जिद्द, चिकाटी आणि क्रीडाभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. स्पर्धांदरम्यान विद्यार्थिनींचा उत्साह व खेळाडूवृत्ती पाहून उपस्थितांनीही त्यांचे कौतुक केले.
स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या संघांना तसेच प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती वर्तक यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. शाळेतील क्रीडा शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले.
महिला दिनानिमित्त आयोजित या स्पर्धांमुळे शाळेतील सर्व विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे तसेच समन्वयक आशिष पाटील, मयूर खोल्लम, अमृत घाडगे आणि शुभम शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button