Uncategorized

गंजाड येथील “मातीचा रंग” स्नेहसंमेलनात गोदावरी कॉलेजच्या विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त सहभाग

गंजाड येथील “मातीचा रंग” स्नेहसंमेलनात गोदावरी कॉलेजच्या विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त सहभाग

दिनांक: 20 फेब्रुवारी 2026

तलासरी (प्रतिनिधी)तलासरी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी MTDC तर्फे आयोजित “मातीचा रंग” स्नेहसंमेलन अंतर्गत वारली कला व पारंपरिक तारपा नृत्याचा विशेष कार्यक्रम गंजाड येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात गोदावरी कॉलेज, तलासरी येथील ४२ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना वारली पेंटिंग काढण्याचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. विशेष म्हणजे, ही प्रशिक्षण कार्यशाळा दिवंगत जिवल्या सोमा यांच्या नातवांकडून घेण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक वारली कलेचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पद्मश्री पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध तारपा वादक भिकला धिंडा उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर तारपा नृत्याचे विविध प्रकार सादर करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना आदिवासी संस्कृतीचा समृद्ध वारसा अनुभवता आला.

कार्यक्रमात वारली चित्रकलेच्या हस्तकलेचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. तसेच महाविद्यालया द्वारे, प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी लिहिलेल्या आदिवासी साहित्याच्या पुस्तकांचा विशेष स्टॉल लावण्यात आला होता.

याशिवाय, कार्यक्रमात पारंपरिक खाद्यपदार्थांचा (Traditional Food) स्टॉल देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला, ज्यातून स्थानिक खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याची सोय MTDC तर्फे करण्यात आली होती, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. महाविद्यालय व ह्या कार्यक्रमाची सांगड MTDC च्या अभिप्सा घोष यांनी घातली व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

एकूणच, “मातीचा रंग” स्नेहसंमेलनांतर्गत गंजाड येथे आयोजित हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारा ठरला. वारली कला, तारपा नृत्य, आदिवासी साहित्य व पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा संगम अनुभवण्याची ही एक विशेष संधी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button