Uncategorized

लायन्स क्लब ऑफ विरार विकासचा ४४ वा वर्धापनदिन : ‘महा मंगलप्रसादम’चे आयोजन

लायन्स क्लब ऑफ विरार विकासचा ४४ वा वर्धापनदिन : ‘महा मंगलप्रसादम’चे आयोजन
विरार (प्रतिनिधी): लायन्स इंटरनॅशनल, डिस्ट्रिक्ट 3231 A3 अंतर्गत कार्यरत लायन्स क्लब ऑफ विरार विकासतर्फे क्लबच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘महा मंगलप्रसादम’ या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून सुमारे १००० लाभार्थ्यांना पूर्ण जेवण देण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत अंबा माता मंदिर, ओल्ड फाटक, विरार पूर्व येथे होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डीजी लायन मनोज बाबूर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी लायन नटवर बंका, लायन विकास सराफ, लायन प्रशांत पाटील, डॉ. लायन ख्वाजा मुदस्सिर, लायन अजय हवेलिया, लायन सुरेंद्रनाथ वुक्कडला, अॅड. लायन पी.एस. रामास्वामी, लायन उमेश गांधी, लायन भारत शाह, लायन चंद्रशेखर घाग, लायन निमिष शाह यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर लायन कल्पेश वाय. शाह व सर्व पदाधिकारी प्रयत्नशील असून अध्यक्ष लायन श्रीहास चुरी, सचिव लायन विकास गोसालिया, खजिनदार लायन ज्योती सिंह आणि प्रथम उपाध्यक्ष लायन वृषाली इंडुलकर यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button