Uncategorized

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे व पिंपळगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद संपन्न !

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे व पिंपळगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद संपन्न !

प्रतिनिधी / विशाल दांडगे

भुसावळ: २६ फेब्रुवारी २०२६

– जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याप्रमाणे केंद्रातील एका शाळेमार्फत आयोजित करण्यात येणारी शिक्षण परिषद यावेळी वरणगाव व तळवेल केंद्राच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात पार पडली. वरणगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहुरखेडे व तळवेल केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव खुर्द यांच्या वतीने सिद्धेश्वर नगर, वरणगाव येथील शाळेत या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. केंद्रप्रमुख राजेश पाटील, मुख्याध्यापक अनिल देशपांडे, मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, वंदना पाटील, उपशिक्षक अशोक तायडे व गुणवंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

परिषदेच्या दरम्यान विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. अध्ययन-अध्यापन साहित्य व प्रश्ननिर्मिती या विषयावर उपशिक्षक अशोक तायडे यांनी मार्गदर्शन केले.

“माझा वर्ग माझे नियोजन” या विषयावर तळवेल शाळेचे उपशिक्षक उमेश कोल्हे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

पायाभूत अध्ययन सर्वेक्षण या विषयावर उपशिक्षिका सौ. रेखा चौधरी यांनी माहिती दिली.

तर स्थानिक पातळीवरील विषय या संदर्भात टहाकळी येथील उपशिक्षिका दिपाली भंगाळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रप्रमुख राजेश पाटील यांनी सर्व शाळांच्या शैक्षणिक तसेच शासकीय कामकाजाचा आढावा घेत मार्गदर्शक सूचना दिल्या.

या शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन काहुरखेडे शाळेतील उपशिक्षक समाधान जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पिंपळगाव खुर्द येथील उपशिक्षिका सविता चंद्रिकापुरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धेश्वर नगर येथील मुख्याध्यापक अनिल देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच काहुरखेडे शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, ममता तडवी व पिंपळगाव खुर्द शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील तसेच उपशिक्षिका सविता चंद्रिकापुरे यांनी नियोजनपूर्वक तयारी करून परिषद यशस्वीरित्या पार पाडली. या कार्याबद्दल दोन्ही केंद्रांतील शिक्षक-शिक्षिकांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button