Uncategorized

भांडूप, ठाणे रेल्वे प्रवासी समस्यांबाबत महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे निवेदन

भांडूप, ठाणे रेल्वे प्रवासी समस्यांबाबत महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे निवेदन


दिनांक : 26 फेब्रुवारी 2026
मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघ (MRPM) यांच्या वतीने भांडूप आणि ठाणे परिसरातील विविध रेल्वे प्रवासी समस्यांबाबत गुरुवार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी भांडूप रेल्वे स्टेशन व्यवस्थापक धनाजी देसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.
महासंघाचे अध्यक्ष तसेच फळ, फुल, भाजीपाला विक्रेते व फेरीवाले श्रमिक संघटनेचे (PPBVFSS) अध्यक्ष आणि सेंट्रल रेल्वे सल्लागार समिती सदस्य (ZRUCC Member), रेल्वे मंत्रालय मा. श्री. अभिजीत धुरत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही भेट झाली. यावेळी भांडूप रेल्वे स्थानक टर्मिनस घोषित करावे, सर्व जलद गाड्यांना थांबा मिळावा, कोकणात जाणाऱ्या गाड्यांना भांडूप येथे थांबा द्यावा तसेच भांडूप–दिवा–सावंतवाडी ही नवीन गाडी सुरू करावी, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.
यापूर्वी 23 ऑगस्ट 2024 रोजी महासंघातर्फे या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. त्या आंदोलनाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाहीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच भांडूप रेल्वे प्रवाशांच्या इतर दैनंदिन अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी महासंघाच्या चाइल्ड सेलच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेणुकाताई साळुंखे, भांडूप स्टेशन अध्यक्ष सुनील करपे, सचिन नागवेकर, मनोज सावंत, सदानंद तांडेल, सतिश पाटील (मुंबई पत्रकार) तसेच इतर पदाधिकारी व रेल्वे प्रवासी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button