Uncategorized
बोरावल बु येथील श्री जागृत क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये वृक्षरोपवन करण्यात आले.
बोरावल बु येथील श्री जागृत क्षेत्र मानकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये वृक्षरोपवन करण्यात आले.
दुसखेडा / विशाल कोळी
यावल : (१ मार्च २०२६)
यावल तालुक्यातील बोरावल बु येथील तापी नदीच्या काठावर वसलेले मानकेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात भाविकांना बसण्यासाठी मंदिराच्या परिसरात वृक्षरोपन करण्यात आले. मानकेश्वर मंदिरात भावीक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात व विश्रांती घेत असतात मात्र मंदिर परिसरात कुठेही सावली नसल्यामुळे उन्हाळाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.
म्हणूनच मित्राच्या मदतीने वड, पिंपळ, अशी मोठी झाडे लावली व परिसर हिरवेगार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे यावेळी महावितरण विज कंपनीचे ऑपरेटर महेद्र जगन्नाथ कोळी , सागर शंकोपाळ, भुषण सोनवणे, लक्ष्मण शंकोपाळ, हिम्मत भासा,चेतन शंकोपाळ, ललित सपकाळे JCP ऑपरेटर यांनी परिश्रम घेतले.