Uncategorized

जयहनुमान प्रिमियर लिग-२०२६ संपन्न..!

जयहनुमान प्रिमियर लिग-२०२६ संपन्न..!


मायखोप (हनुमान पाडा), प्रतिनिधी :
जयहनुमान क्रिकेट मैदान, मायखोप (हनुमान पाडा) येथे जयहनुमान प्रिमियर लिग (JHPL) २०२६ ही भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत उत्साहात पार पडली. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यंदा एकूण सहा संघांनी सहभाग नोंदवला.
स्पर्धेत उत्कंठावर्धक सामने रंगले. कुशल क्लासेस स्टार ११ संघाने प्रथम पारितोषिक पटकावले, तर आई बाबा इंटरप्रायजेस संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.
🏆 वैयक्तिक पारितोषिक विजेते
🟣 मॅन ऑफ द सिरीज – अक्षय रवींद्र पाटील
🟣 उत्कृष्ट फलंदाज – प्रज्वल मनोज पाटील (कुशल क्लासेस स्टार ११)
🟣 उत्कृष्ट गोलंदाज – महेश सुरेश शिंदे (परी ११)
🟣 उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – स्वराज भूषण घरत (आई बाबा इंटरप्रायजेस)
🟣 मॅन ऑफ द मॅच (उपांत्य फेरी) – ११ वर्षीय स्वनीत नितेश गावड (स्वनीत ११)
👩 महिलांसाठी विशेष स्पर्धा
दुपारी ३ ते ५ या वेळेत महिलांसाठी संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात व चेंडू जमा करणे आदी खेळांचे आयोजन करण्यात आले.
इतर स्पर्धांचे विजेते :
🔷 संगीत खुर्ची – रेश्मा पाटील, गौरी पाटील
🔷 बकेट बॉल – सुवर्णा गावड-पाटील, सुनिता गावड
🔷 संगीत खुर्ची (दुसरा गट) – रिया पाटील, आराध्या सिंग
🔷 सायकल गेम – वेद पाटील, अक्षय
विजेत्या संघांना व उत्कृष्ट खेळाडूंना आगरी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
या प्रसंगी कवी महेंद्र पाटील, साहित्यिक संजय पाटील, तसेच डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सचिव दयानंद पाटील उपस्थित होते.
दयानंद पाटील यांनी सांगितले की, “गावपातळीवरील अशा स्पर्धा ऐक्याचे प्रतीक असून मुलींसाठीही क्रिकेट स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.”
कवी महेंद्र पाटील यांनीही हनुमान पाडा येथील उत्साही आयोजनाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे गावातील एकोपा अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button