चिचंणी येथे शिवजयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने परिसर दणाणला



चिचंणी येथे शिवजयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने परिसर दणाणला
पालघर (प्रतिनिधी): चिचंणी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चौकातून खाडी नाका पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवप्रेमी नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.
मिरवणुकीत घोडेस्वार, आकर्षक वेषभूषा सादरीकरण, ढोल-ताशा पथक तसेच देवभक्तीपर गीतांच्या गजरात वातावरण भारावून गेले. यावेळी श्री. जगदीश विंदे यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्याने उपस्थितांमध्ये शिवभक्तीची उर्जा निर्माण केली.
या कार्यक्रमाचे आयोजन गुढी पाडवा शोभा यात्रा समिती व सर्व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुरोहित जोशी बंधू, कदम बंधू, दर्शन शिंदे, वैभव वझे, संदीप लोणकर, हर्षल ओझा, देवानंद शिंगडे तसेच स्वयंभू ढोलताशा पथक यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच वाणगाव प्रभारी पाचपुते सर, शिवकुमार सर आणि चिचंणी ग्रामपंचायत प्रशासन यांनीही कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या भव्य मिरवणुकीमुळे चिचंणी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.