Uncategorized

अर्नाळा आरमार प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाला शेकडो पुस्तकांची भेट; तरुणाईसाठी उघडला ज्ञानाचा खजिना

अर्नाळा आरमार प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाला शेकडो पुस्तकांची भेट; तरुणाईसाठी उघडला ज्ञानाचा खजिना

वसई (अर्नाळा)/प्रसाद भालेराव
अर्नाळा येथील आरमार प्रतिष्ठानच्या ग्रंथालयाला वाचनाची आवड जोपासणारे दिवंगत मधुसूदन पित्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र मंदार मधुसूदन पित्रे यांनी त्यांच्या वडिलांनी आयुष्यभर जपून ठेवलेला शेकडो पुस्तकांचा मौल्यवान संच दान करून एक प्रेरणादायी सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.समाजातील तरुणाईला शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विविध क्षेत्रातील सखोल ज्ञानाचीही गरज आहे. हीच गरज ओळखून आणि आजच्या मोबाईलधारी तरुणाईला वाचन संस्कृतीकडे वळवण्यासाठी अर्नाळा येथील आरमार प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून ग्रंथालय उभारण्यात आले आहे.
या ग्रंथालयासाठी दिवंगत मधुसूदन पित्रे यांनी त्यांच्या जीवनकाळात जपलेली शेकडो पुस्तके दान स्वरूपात उपलब्ध करून देत त्यांच्या सुपुत्र मंदार पित्रे यांनी वडिलांच्या स्मृतींना एक सुंदर आणि समाजोपयोगी अभिवादन दिले आहे. या पुस्तकांमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना तसेच वाचनप्रेमींना मोठा लाभ होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी आरमार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश भरत बावकर, त्यांचे सहकारी मित्र राम रवी वैती तसेच अक्षय प्रकाश सपकाळ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करत, अशा दानशूर वृत्तीमुळे समाजात वाचन संस्कृतीला नवे बळ मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button