Uncategorized

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई (प्रतिनिधी), दि. २४ :
महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिली.
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील खारघर येथे सिडकोच्या जागेवर उभारण्यात आलेल्या श्री सत्य साई संजीवनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्राद्वारे राज्यातील बालकांना अत्याधुनिक हृदयविकार उपचार सुविधा उपलब्ध होत आहेत.
या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण २,५०७ टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग असलेल्या ३,२२६ बालकांवर उपचार करण्यात आले.
तसेच, पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी बहुल तालुक्यांना दत्तक घेऊन विशेष आरोग्य उपक्रम राबविण्यात आले आहेत. पुणे शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या असून, रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातही आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यात येत आहेत.
विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणीसाठी मेगा शिबिरे आयोजित करण्यात येत असून, दुर्गम भागातील बालकांनाही आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत.
याशिवाय, नवी मुंबई येथे बांधकाम व वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) व कर्करोग तपासणी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे.
आजपर्यंत आशा, अंगणवाडी सेविका, सहाय्यक परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी अशा ३,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक होत असल्याचेही मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button