सुखी जीवनाचा मूळ मंत्र- कार्यक्रम, माकुणसर ता.जि.पालघर येथे संपन्न



सुखी जीवनाचा मूळ मंत्र- कार्यक्रम, माकुणसर ता.जि.पालघर येथे संपन्न
११ मार्च
सफाळे ( एच लोखंंडे ) दिनांक १० मार्च २०२६ रोजी श्री. दत्तमंदिर सभागृह माकुणसार येथे. विद्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्यालय ( स्वयंत्त संस्था ) यांच्या कडून आयोजित करून यशस्वीपणे संपन्न करण्यात आला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री विकास बंधू वर्तक – अध्यक्ष विध्यावर्धिनी विराजमान होते. तर प्रमुख वक्ते – डॉ राकेश हिमते सर -प्राचार्य, विध्यावर्धिनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, प्रमुख पाहुणे मा.श्रीम. प्राजक्ता पाटील सपोनि पालघर पोलीस ठाणे, श्री. आर. एम. प्रभुदेसाई – आर्थिक सल्लागार नालासोपारा, पल्लवी पाटील सरपंच माकुणसर, श्री पंकज म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते, श्री नितीन राऊत श्री दत्तमंदिर माकुणसार चिटणीस, श्री. प्रभाकर पाटील माजी उपसरपंच आदि विराजमान होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ राकेश हिमते सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, सुखी जीवनाचा मूळ मंत्र,म्हणजे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ देणे, समाधानी राहणे आणि गरजूंना मदत करणे होय। अति लोभ टाळून, मोबाईलचा वापर कमी करून आणि रोजच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणल्यास आयुष्यात सुख आणि शांती नक्कीच मिळते. ”सुखी जीवनासाठी काही प्रमुख गोष्टी म्हणजे, नोकरी-व्यवसाय सांभाळून स्वतःच्या आनंदासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. आपल्याकडे आहे, त्यात आनंद मानणे (संतोष) हा सर्वात मोठा गुण आहे. आपली इतरांशी तुलना करणे टाळा आणि स्वतःची ओळख निर्माण करा. ताणतणावमुक्त राहण्यासाठी व्यायाम आणि सकस आहार घ्या. स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणा, कारण विचारांतूनच आयुष्य घडते. आनंद शोधा , गरजा तर आयुष्यभर संपणार नाही. स्वतः मध्ये बदल घडवा कारण बदल घडवल्याशिवाय आयुष्य घडत नाही. कोणाची नक्कल करू नका, स्वतःची ओळख निर्माण करा.” असे सांगितले. इतर मान्यवर यांनी ही आप आपल्या परीने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री.पंकज म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते तथा माकुणसार ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले. तर आभार प्रदर्शन कार्य प्रा. प्रदिप गुलभुले – कॅम्प ऑर्डिनेटर वसई यांनी केले.