Uncategorized

सन्मान धवलारणींचा’ पारंपारिक आगरी-कोळी धवलगीत स्पर्धा २०२६ (पर्व–२) उत्साहात संपन्न

सन्मान धवलारणींचा’ पारंपारिक आगरी-कोळी धवलगीत स्पर्धा २०२६ (पर्व–२) उत्साहात संपन्न


मुंबई प्रतिनिधी : (सतिश पाटील)
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च २०२६ रोजी स्व. डी.आर. पाटील साहेब व स्व. भोलानाथ पाटील साहेब यांच्या स्मरणार्थ “आगरी-कोळी संस्कृतीचा सन्मान धवलारणींचा” पारंपारिक धवलगीत स्पर्धा २०२६ (पर्व–२) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. हा कार्यक्रम नवी मुंबईच्या नगरसेविका सौ. कविता चंद्रकांत पाटील आणि माथाडी नेते चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालय, सेक्टर–२२, तुर्भेगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
या स्पर्धेत नवी मुंबईमधील ३२ धवलारणींनी सहभाग घेतला. तसेच खुल्या गटातून ठाणे, उरण, कल्याण, पनवेल आणि भिवंडी येथील ११ धवलारणींनी सहभाग नोंदवून स्पर्धेला रंगत आणली.
स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी ‘थांब थांब कासारा…’ या गीतामुळे प्रसिद्ध असलेल्या आगरी समाजातील सुप्रसिद्ध गायिका चंद्रकला दासरी (कल्याण), ‘धवलारीन… एक आगरी पुरोहित’ या पुस्तकाचे लेखक तसेच विविध पुरस्कारांनी सन्मानित कवी नवनाथ ठाकूर (खिडकाळी) आणि संगीतकार-गीतकार दया नाईक (भिवंडी) हे मान्यवर परीक्षक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रंजना पाटील यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
स्पर्धेत नवी मुंबई गटातून तीन आणि खुल्या गटातून तीन अशी एकूण सहा पारितोषिके देण्यात आली. विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, शॉल-श्रीफळ, वस्त्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी धवलारणी आणि परीक्षकांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व असून ठाणे, रायगड, पालघर आणि मुंबई या चारही जिल्ह्यांत या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या धवलारणींना मंच उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलेचा सन्मान करण्याचे कौतुकास्पद कार्य चंद्रकांत पाटील आणि सौ. कविता पाटील हे दांपत्य करत असल्याचे मत लेखक नवनाथ ठाकूर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या नियोजन व संकल्पनेत कवी-धवलगीत गायिका सौ. संगीता पाटील (तुर्भे) तसेच कवी, गायक आणि लेखक अशोक गुळवी (भिवंडी) यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button