खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या हस्ते ओझोन हाँस्पिटलच्या कँथलँबचे उद्घाटन





Press Note –
खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या हस्ते ओझोन हाँस्पिटलच्या कँथलँबचे उद्घाटन



पालघर(प्रतिनिधी)- ओझोन हायटेक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, जुने कलेक्टर आँफिस, चिंतुपाडा रोड, पालघर येथे शनिवार दि.१४ मार्च २०२६ रोजी पालघर लोकसभेचे खासदार मान. डॉ. हेमंत सावरा साहेब यांच्या शुभहस्ते कॅथलॅबचे उद्घाटन संपन्न झाले. पालघर शहरात वैद्यकीय उपचारासाठी सुसज्ज व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या ओझोन हॉस्पिटलची स्थापना २० फेब्रुवारी २०२५ रोजी झाली होती. आजतागायत या हॉस्पिटलला एक वर्ष पूर्ण झाले आहे. हृदयाच्या अँन्जीओग्राफी व अँन्जीओप्लास्टी टेस्टसाठी कॅथलॅॅबची गरज लक्षात घेऊन नवीन व अत्याधुनिक यंत्रसामुग्रीयुक्त असलेली कॅथलॅब ओझोन हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आली आहे. या कॅथलॅबच्या उद्घाटन प्रसंगी माननीय खासदार डॉ. हेमंत सावरा साहेब, डॉ. नवीन अग्रवाल (प्रसिद्ध कार्डिओलाँजिस्ट), डॉ. राजेंद्र चव्हाण, डॉ. उज्वला काळे, कैलास म्हात्रे, अरुण जैन, भावानंद संखे, अशोक अंबुरे, लाडकी लेक संस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील, सत्यप्रकाश सिंग, चंदा दुबे, नंदन वर्तक, आनंद धोडी (सरपंच, सरावली), सूर्यकांत सिंग, नरेश जैन, अरुण माने आदी मंडळी उपस्थित होते.
ओझोन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने डॉ.अतुल पारसकर, डॉ. राज हंबर्डे, डॉ. गणेश शिरोडकर, डॉ.अमित यादव, डॉ. श्याम पारसकर यांनी ओझोन हॉस्पिटलच्या अल्प दरात असलेल्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्याबाबत पालघरमधील जनतेला आवाहन केले आहे.