पालघर ग्रंथोत्सव २०२५ : काव्य संमेलन उत्साहात संपन्न

पालघर ग्रंथोत्सव २०२५ : काव्य संमेलन उत्साहात संपन्न
पालघर, दि. २९ (प्रतिनिधी – संजय पाटील) :
पालघर जिल्ह्यातील वसई येथे महाराष्ट्र शासनांतर्गत आयोजित पालघर ग्रंथोत्सव २०२५ निमित्त भव्य काव्य संमेलन उत्साहात पार पडले. या काव्य संमेलनाचे अध्यक्षस्थान कवयित्री सुषमा राऊत यांनी भूषविले.
कार्यक्रमास सहाय्यक ग्रंथालय संचालक (मुंबई विभाग) प्रशांत पाटील, अशोक ठाकुर, प्रकाशक अशोक मुळे, समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वनमाळी यांसह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या काव्य संमेलनात विविध मान्यवर कवी-कवयित्रींनी आपल्या उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. यामध्ये संगिता अरबुने, संजय पाटील मायखोपकर, शुभम पाटील, प्रकाश पाटील (अध्यक्ष, को.म.सा.प. वसई), सुरेखा धनावडे, विजय पुरव, सुप्रिम म्हसकर, समीर पराडकर, प्रशांत पाटील, वैशाली चौधरी, हरिचंद्र मिठबावकर, अमोल नाईक, विशाखा गाळवणकर, विक्रांत केसरकर, प्रविण पाटील, ज्योती बालिगा राव, सीमा पाटील, मंजुषा गवई, किशोरी पाटील, योगेश गोतारणे, प्रा. सखाराम डाखोरे आदींचा समावेश होता.
कवींनी सादर केलेल्या विविध विषयांवरील कवितांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिल्पा पै-परुळेकर यांनी प्रभावीपणे केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी कवी-कवयित्रींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, चिन्ह व ग्रंथ देऊन गौरव करण्यात आला.
एकूणच, या काव्य संमेलनाने पालघर ग्रंथोत्सवाला साहित्यिक रंग चढवून रसिकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरवला.