पालघर व डहाणू नगराध्यक्षांच्या दणदणीत विजयानिमित्त
शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष मा. कुंदनजी संखे यांचे प्रभावी नेतृत्व ठळक
पालघर व डहाणू नगराध्यक्षांच्या दणदणीत विजयानिमित्त
शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष मा. कुंदनजी संखे यांचे प्रभावी नेतृत्व ठळक
पालघर (प्रतिनिधी)पालघर व डहाणू नगरपरिषद निवडणुकांत शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षांनी मिळवलेला दणदणीत विजय हा योगायोग नसून, त्यामागे शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष मा. कुंदनजी संखे यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. उमेदवार उभे करणे तुलनेने सोपे असते; मात्र त्यांना निवडून आणणे ही अत्यंत कठीण, कसोटीची आणि नियोजनाची लढाई असते — आणि ही लढाई कुंदनजी संखे यांनी समर्थपणे जिंकली आहे.
योग्य रणनीती, कार्यकर्त्यांवर असलेली मजबूत पकड, बूथ पातळीवरील काटेकोर नियोजन, जनतेशी असलेला थेट संवाद आणि अहोरात्र केलेली मेहनत यामुळेच पालघर व डहाणूत शिवसेनेला हे घवघवीत यश मिळाले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. निवडणूक काळात त्यांनी दाखवलेले नेतृत्व, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास हाच या विजयाचा खरा कणा ठरला आहे.
हा विजय केवळ नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा नसून, तो शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि मा. कुंदनजी संखे यांच्या प्रभावी, ठाम व निर्णयक्षम नेतृत्वाचा विजय आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी दाखवलेली ऊर्जा, निष्ठा आणि समर्पण यामुळेच शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा जनतेसमोर सिद्ध झाली आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष मा. कुंदनजी संखे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा