मध्य रेल्वे स्थानकांना व्हीलचेअर वाटप; प्रवाशांसाठी उपयुक्त उपक्रम





मध्य रेल्वे स्थानकांना व्हीलचेअर वाटप; प्रवाशांसाठी उपयुक्त उपक्रम


मुंबई (प्रतिनिधी)
दि सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवित मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
ट्रस्टच्या ३९ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत लायन्स क्लब ऑफ गार्डन व्ह्यू, मुंबई, स्वामीनारायण मंदिर, कल्याण व रोटी डे ग्रुप, कल्याण यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) व पनवेल या सहा स्थानकांना प्रत्येकी एक अशा व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आल्या.
या व्हीलचेअर संबंधित स्थानकांच्या स्टेशन मास्टरांना, त्या-त्या स्थानकांच्या सीटीआय व ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आल्या. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व गरजू प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लब ऑफ गार्डन व्ह्यू, मुंबईचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स फिरोज कात्रक, फर्स्ट व्हाइस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन्स पवनकुमार अग्रवाल, रोटी डे ग्रुपचे नितीनभाई, स्वामीनारायण मंदिराचे दिनेश ठक्कर यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये SRDCM (Works) प्रकाश कनोजिया, स्टेशन डायरेक्टर चंद्रकांत पगारे, ACM TC पंकज कुमार, DCTI प्रदीप कोरी यांचा समावेश होता.
तसेच ट्रस्टचे अध्यक्ष डी. व्ही. चिंदरकर, सेक्रेटरी हरिश मोंडकर, खजिनदार गिरीश कदम, उपाध्यक्ष अभय कांबळे, ट्रस्टी शेखर तांबे, बाला पिल्लाई, आर. एम. बिरवटकर, प्रसाद करलकर, लीना गोरडे, सुचिता साळवी तसेच सभासद सचिन सावंत व दिपक पापन उपस्थित होते.
या उपक्रमामुळे प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये भर पडत असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही देण्यात आला आहे.
– हरिश मोंडकर (सेक्रेटरी)
📞 9167089036