Uncategorized

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठा करण्यासाठी अर्ज सादर करावे

सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन पुरवठा करण्यासाठी अर्ज सादर करावे

पालघर(प्रतिनिधी )दि 1 एप्रिल : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या अधिपत्याखालील पळसुंडे (ता. मोखाडा) येथील प्रशिक्षण केंद्रासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात भोजन पुरवठ्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
प्रशिक्षण केंद्रात निवड झालेल्या युवक व युवतींसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय सत्रात दोन वेळचे पौष्टिक जेवण तसेच सकाळचा नाश्ता (अंडी व दूध) पुरविण्याची जबाबदारी देण्यासाठी बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांनी अर्ज सादर करावेत.
अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२६ पर्यंत चालणार आहे. इच्छुक संस्थांनी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करताना प्रशासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
प्रस्ताव सादरीकरणासाठी महत्त्वाच्या सूचना पुढीलप्रमाणे
संस्थेची सर्व कागदपत्रे स्वतंत्र लिफाफ्यात सादर करणे बंधनकारक आहे.
दरपत्रकासाठी वेगळा लिफाफा वापरणे आवश्यक आहे.
सर्व कागदपत्रे बंद लिफाफ्यात निश्चित मुदतीत सादर करावीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button