Uncategorized

वांद्रे–उधना मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी.

वांद्रे–उधना मार्गावरील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी
पालघर/डहाणू (प्रतिनिधी) —
वांद्रे–उधना रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, आठवड्यातून दोन दिवस बंद असणाऱ्या गाड्यांच्या जागी नवीन पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात येत आहेत, अशी माहिती डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था (DVPSS) यांनी दिली आहे.
सध्या ०९०५५ वांद्रे–उधना आणि ०९०५६ उधना–वांद्रे या पॅसेंजर गाड्या आठवड्यातून दोन दिवस बंद राहतात. मात्र प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था जाहीर केली आहे. त्यानुसार ०९०३५ वांद्रे–उधना ही गाडी शुक्रवार व शनिवार तसेच ०९०३६ उधना–वांद्रे ही गाडी गुरुवार व शुक्रवार चालविण्यात येणार असून, या गाड्या दिनांक २९ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहेत.
या नव्या व्यवस्थेमुळे वांद्रे–उधना मार्गावरील सकाळची व संध्याकाळची पॅसेंजर सेवा संपूर्ण आठवडा नियमितपणे उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणारे कामगार, विद्यार्थी व सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले असून, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button