Uncategorized

केळवेरोड रेल्वे स्थानकातील उंच झिगझॅग पुलास हवी लिफ्ट…!

केळवेरोड रेल्वे स्थानकातील उंच झिगझॅग पुलास हवी लिफ्ट…!

प्रवाशांच्या सोयीसाठी सफाळे रेल्वे स्थानकात झिगझॅग पादचारी पुलाला जोडून बहुप्रतीक्षित लिफ्टचे लोकार्पण दि. १४ नोव्हेंबर २०२५रोजी पालघर लोकसभेचे खासदार डॉ.हेमंत सावरा ह्यांच्या हस्ते करण्यात आले त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे धन्यवाद.
केळवे रोड पूर्वेस खुप नागरी वस्ती निर्माण झाली आहे तसेच तसेच आधी पूर्वापार पासून बहुतांश आदिवासी बांधव ह्या पूर्व भागात कायमस्वरूपी राहत आहेत. केळवेरोड़ स्थानकाशी ग्रामपंचायत वाकासई-केळवेरोड, मायखोप ग्रुपग्रामपंचायत, केळवे ग्रामपंचायत व माकुणसार ग्रामपंचायत इत्यादी चार ग्रामपंचायतींचे दैनंदिन प्रवासी वर्ग जोडले गेले आहेत व प्रवास करीत आहेत.
सदर सर्व शाळा, बाजारपेठ आणि दवाखाने तसेच तिकीट खिडकी केळवेरोड पच्छिमेस असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी व कामधंद्यासाठी पूर्वे कडून पच्छिमेस येणे क्रमप्राप्त होते. नुकताच DFCC माल गाड्यांची वाहतूक सफाळे पर्यंत सुरू झाल्याने तसेच मेल एक्सप्रेस च्या मेन लाईन लोहमार्गावर अतिशय वेगवान तसेच दार तीन मिनिटाला एक गाडी अशी वर्दळ वाढली आहे. तसेच DFCCL व MRVC यांनी रेल्वे च्या दोन्ही बाजूला कुंपण टाकून रेल्वेमार्ग सुरक्षित केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत रेल्वेमार्ग पार करण्यासाठी सध्या पर्यायी एकच झिगझॅग पद्धतीचा पादचारी पूल उपलब्ध असून तो पार करुन जाण्यासाठी वयस्कर मंडळी, शालेय विद्यार्थी ,रुग्ण,गरोदर महिला ह्यांना खूपच त्रासदायक होत आहे. तरी ह्या पुलाला जोडून एक्सेलेटर किंवा लिफ्टची सोय तातडीने करण्यात यावी अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे.
प्रतिक्रिया :
खरोखरच केळवे रोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील उंच अशा झिगझॅग पुलाला जोडून सुद्धा अशा प्रकारे लिफ्ट ची आवश्यकता आहे जेणेकरून जेष्ठ नागरिक, महिला वर्ग तसेच शाळेय विद्यार्थी ह्यांना एक ते दिड किलोमीटर लांबून रेल्वे पुलाखालून जाण्याचा त्रासदायक प्रवास वाचू शकेल.पूर्वेकडील नागरीकांना पच्छिमेला याव लागते तर पच्छिमे कडील नागरिकांना पूर्वेकडे जावे लागते त्यादृष्टीने पच्छिमेला सुद्धा लिफ्ट/ एक्सेलेटर अतिशय आवश्यक आहे.
तशात जे अती घाईने गाडी पकडण्यासाठी लोहमार्ग पार करतात त्यांचा कधी कधी रेल्वे अपघात सुद्धा घडले आहेत. त्यादृष्टीने पूर्वेकडे लिफ्ट तातडीने होणे आवश्यक आहे ज्या प्रमाणे सफाळे येथे झाली.
श्री.विनोद ह. किणी
केळवेरोड .

दयानंद पाटील
मायखोप, केळवेरोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button