डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे विज्ञान प्रदर्शन


डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे विज्ञान प्रदर्शन
प्रतिनिधी / विशाल दांडगे
सावदा : ( ८ डिसेंबर २०२५)
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा येथे नुकतेच विज्ञान प्रदर्शन पार पडले त्यात विद्या विकास मंडळ संचलीत एस .पी. राणे विद्यालय व खिर्डी कनिष्ठ महाविद्यालय खिर्डी खु.चे प्रा.श्री.संतोष भाऊलाल पाटील यांनी Agruculture wast project सादर केला असता त्यांच्या या प्रोजेक्ट ला तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवीला,त्या बद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.श्री.संदीपदादा भंगाळे उपाध्यक्ष श्री.विलास दादा पाटील चेरमन डॉ.श्री.सुनिल कोल्हे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी श्री.संतोष भाऊलाल पाटील सरांचे अभिनंदन केले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका ,कर्मचारी तर्फे स्वागत करण्यात आले.
सत्कार करतांना वरिष्ठ शिक्षक श्री.जे.बी.फेगडे सर शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद. मातीचे प्रदुषण रोखन्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करावा – संतोष भाऊ पाटील सर यांनी व्यक्त केले. तर संकलन शरिफ तडवी सर यांनी केले. कार्य क्रमाचे सुत्रसंचालन वाय.बी.नेरकर यांनी केले.