मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मान ग्रामपंचायतीत वनराई बंधाऱ्याचे बांधकाम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मान ग्रामपंचायतीत वनराई बंधाऱ्याचे बांधकाम




. बोईसर (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागातून मान ग्रामपंचायत हद्दीत वनराई बंधाऱ्याचे यशस्वीरीत्या बांधकाम करण्यात आले. पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रसंगी मान ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अंजली भावर, ग्रामपंचायत अधिकारी रमेश उंदरे, कृषी सहाय्यक सौ. पूजा संखे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, भविष्यातही अशा जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.