Uncategorized

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!


राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा ८ वा वर्धापन दिन उत्साहात बुलढाणा येथे मोठ्या उत्साहात संपन्न..!

कैलासराजे घरत
रायगड जिल्हा प्रतिनिधी


राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन ऐतिहासिक बुलढाणा येथील गर्दे सभागृहात दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. या वर्धापन दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी आमदार संजय भाऊ गायकवाड व बुलढाणा येथील प्रतिष्ठित मान्यवर, संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर, कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, राष्ट्रीय प्रमुख सल्लागार सुभाष बिंदवाल, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार, प्रवीण परमार यांच्यासह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेले संघाचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख अतिथी आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी यांनी पत्रकारांचे हक्क, सुरक्षा व सन्मान यासाठी संघाने अधिक सक्षमपणे काम करावे, असे मार्गदर्शन केले. पुरोगामी पत्रकार संघ आपल्या भरीव कामगिरीने नावलौकिक मिळवत आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच बाहेरील राज्यातील पत्रकार सहभागी असून समाज सेवेचे पवित्र कार्य त्यांच्या हातून घडत आहे. ज्यांना समाजसेवेची आवड आहे त्यांनी पुरोगामी पत्रकार संघाचे सदस्य व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.
यावेळी पत्रकारांसाठीच्या प्रमुख ८ मागण्यांचे निवेदन माननीय आमदार संजय भाऊ गायकवाड यांना सादर करण्यात आले. कार्यक्रमानंतर संघाच्या आगामी वाटचालीसाठी बैठक घेऊन कोअर कमिटी स्थापन करणे, पत्रकारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे तसेच पत्रकारांसाठी गृहनिर्माण व सामाजिक सुरक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात आले. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय तसेच कार्यक्रमाचे अतिशय सुरेख नियोजन राज्य अध्यक्ष श्री.विष्णू कंकाळ यांनी केले होते सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अतिशय आनंदाने आणि उत्साहात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button