Uncategorized

कल्याण स्टेशनवरील सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्टचा सामाजिक उपक्रम

कल्याण स्टेशनवरील सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्टचा सामाजिक उपक्रम
कल्याण (प्रतिनिधी):
एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या सामाजिक भावनेतून द सेंट्रल रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने कल्याण रेल्वे स्थानकावरील सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘एक हात मदतीचा’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
तिकीट चेकिंग वेल्फेअर ट्रस्ट आपल्या ३९ व्या वर्षात पदार्पण करत असल्याचे औचित्य साधून तसेच नववर्षाचे स्वागत सामाजिक उपक्रमाद्वारे करण्याच्या उद्देशाने, शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता कल्याण स्टेशन मॅनेजर कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत कल्याण स्टेशनवरील ६५ सफाई (हाऊसकीपिंग) कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक अन्नधान्याच्या किटचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम आदरणीय श्री शशांकजी दीक्षित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून
आदरणीय श्री नितीनभाई (रोटी डे ग्रुप, कल्याण),
आदरणीय श्री दिनेश जे. ठक्कर (स्वामी नारायण हॉल, कल्याण),
आदरणीय श्रीमती मधुबेन जे. ठक्कर,
श्री पुजारा साहेब व ज्योतीबेन पुजारा (समाजसेविका),
आदरणीय श्री हरजीराम मीणा साहेब (स्टेशन मॅनेजर, कल्याण),
आदरणीय श्री राहुल गुजरे साहेब (CPS – कल्याण),
आदरणीय श्री राहुल मालवीया साहेब (DY CPS – कल्याण)
यांची उपस्थिती लाभली.
तसेच ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय श्री डी. व्ही. चिंदरकर साहेब यांच्या हस्ते अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
या वेळी ट्रस्टचे
सेक्रेटरी श्री हरिश मोंडकर,
खजिनदार श्री गिरीश कदम,
उपाध्यक्ष श्री अभय कांबळे,
ट्रस्टी श्री आर. एम. बिरवटकर,
श्री प्रसाद करलकर,
ऐक्टिव सभासद श्री सुनील नैनानी, श्री पी. डी. मोरे, श्री युवराज डोहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारा हा उपक्रम उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली.
✍️ — हरिश मोंडकर
सेक्रेटरी, तिकीट चेकिंग स्टाफ वेल्फेअर ट्रस्ट, मुंबई
📞 मो. ९१६७०८९०३६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button