भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वसई तालुका अध्यक्षपदी
रुपेश रमेश मोहिते यांची निवड
युवक-तरुणांना नवी संधी; वसई तालुक्यात आनंदाचे वातावरण


भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वसई तालुका अध्यक्षपदी
रुपेश रमेश मोहिते यांची निवड
युवक-तरुणांना नवी संधी; वसई तालुक्यात आनंदाचे वातावरण
वसई (प्रतिनिधी):
भीम आर्मी भारत एकता मिशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर (रावण) विनयसिंग जी यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली, रुपेश रमेश मोहिते यांची वसई तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीमुळे वसई तालुक्यातील युवक व तरुणांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक न्याय, समता व बंधुतेच्या विचारांना नव्याने बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. रुपेश मोहिते हे युवकांमध्ये लोकप्रिय असून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागासाठी ते परिचित आहेत.
नवीन जबाबदारी स्वीकारताना रुपेश मोहिते यांनी सांगितले की,
“भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून वसई तालुक्यातील युवकांना संघटित करून शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय व संविधानिक हक्कांसाठी काम करणार आहे. सर्वसामान्य, वंचित व दुर्लक्षित घटकांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू.”
या निवडीचे स्वागत करताना कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आगामी काळात वसई तालुक्यात संघटन वाढ, युवक सक्षमीकरण व सामाजिक उपक्रमांद्वारे भीम आर्मी भारत एकता मिशन अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.