Uncategorized

अभिनंदन परिवारातील नवनियुक्त नगरसेविकांचे.निवडणुकीचे मैदान गाजवणाऱ्या रणरागिणींचे. अभिनंदन जिजाऊ,सावित्री , रमाईंच्या लेकींचे.

अभिनंदन परिवारातील नवनियुक्त नगरसेविकांचे.निवडणुकीचे मैदान गाजवणाऱ्या रणरागिणींचे. अभिनंदन जिजाऊ,सावित्री , रमाईंच्या लेकींचे.

प्रतिनिधी / विशाल दांडगे

भुसावळ : ४ जानेवारी २०२६

भुसावळ : आमच्या स्नेही नात्यातील परिवारातील वरणगाव आणि भुसावळ या नगरपालिकेत प्रचंड लोकमताने विजयी झालेल्या नवनियुक्त नगरसेविकांचे अभिनंदन करताना मनस्वी आनंद झाला ….!
वरणगाव नगरपालिकेच्या प्रथम नगराध्यक्ष राहिलेल्या आदरणीय ताईसाहेब सौ. अरुणाताई इंगळे , कामगार नेते , जनसेवक आणि वादळी व्यक्तिमत्व असलेले भैय्यासाहेब मिलिंद मेढे यांच्या पत्नी आमच्या वहिनीसाहेब सौ. मालाताई मिलिंद मेढे या रणरागिनी वरणगाव नगर परिषदेच्या नगरसेवक पदी दुसऱ्यांदा लोकमताच्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्यात .
भुसावळ नगरपालिकेच्या सभागृहात बंधू प्रशांत नरवाडे सर यांच्या पत्नी सौ. सीमाताई नरवाडे तर बंधू प्रा .आर.बी.इंगळे सर यांच्या पत्नी सौ. शोभाताई इंगळे , मित्रवर्य प्रेमचंद उर्फ अल्बर्ट तायडे यांच्या पत्नी आमच्या सुनबाई सौ.पूजा तायडे या लोकमताच्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्यात ….. आमच्या परिवारासाठी हा नक्कीच आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
वंदनीय राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई, त्यागमूर्ती रमाई यांचा संघर्षाचा जनसेवेचा वारसा आमच्या या महिला नगरसेविकांच्या व्यक्तिमत्त्वात आणि परिवाराच्या रोमा रोमात भरलेला आहे…. ..निवडणुकीचे मैदान गाजवून विजयी झालेल्या या आमच्या परिवारातील रणरागिनींना(सन्माननीय नगरसेविकांना) जनसेवेच्या पुढील विकासात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा….!
नगरपालिकेच्या सभागृहातील कामगिरीचा आम्हाला आणि समाजाला अभिमान वाटेल असेच कार्य तुम्ही कराल , हा विश्वास आहे… तुम्हा सर्वांना जनसेवेच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अनंत मंगल कामना….!
— प्रा.जतिन मेढे / लहान वाघोदे – भुसावळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button