दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदान शिबीर!




दि. बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदान शिबीर!
दिनांक: ०५जानेवारी २०२६
मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील)
लोकनेते दि.बा. पाटील साहेब यांच्या जन्मशताब्दी निमित्त पनवेल ऊरण आगरी समाज मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे रविवार दिनांक ०४ जानेवारी रोजी मंडळाचे महात्मा फुले सभागृहात करण्यात आले होते (पनवेल). ८७ व्यक्तींनी रक्तदान करून लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांना आदरांजली वाहिली. शिबिराचे उद्घाटन सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते झाले. शिबिरास मा. खासदार रामशेठ ठाकूर साहेब, डॉ. नितीन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेविका दर्शना भोईर व अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.मुंबई पत्रकार : श्री. सतिश पाटील यांनी रक्त दान केले सहा वेळा रक्तदान केले. तसेच सर्व रकतदात्याना प्रमाण पत्र व दि.बा. पाटील यांच्या नावाने भेटवस्तू थर्मास बॉटल आगरी समाज मंडळाच्या माध्यमातून देण्यात आली.शिबिराचे आयोजनासाठी पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल दि.बा. पाटील, सचिव बी.पी. म्हात्रे, कोषाध्यक्ष विजय गायकर यांनी खूप मेहनत घेतली.शिबीर आगरी समाज उरण -पनवेल मंडळ व रूधिरसेतु सेवा संस्था पनवेल यांच्या विद्यमाने संपन्न झाला. प्रत्येकाने रक्तदान करून मानवता धर्माचे सार्थक करावे.तुमचे एक रक्तदान अनेकांना जीवनदान देऊ शकते.