Uncategorized

चारोटी-कासा परिसरात अवैध भंगार व्यवसायाचा सुळसुळाटचोरीच्या घटनांत वाढ; पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

चारोटी-कासा परिसरात अवैध भंगार व्यवसायाचा सुळसुळाटचोरीच्या घटनांत वाढ; पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

डहाणू/प्रसाद भालेराव
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी नाका व कासा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर भंगाराच्या दुकानांनी डोके वर काढले असून, यामुळे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी चारोटी नाक्यावरील एका गॅरेज दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा तोडून दोन अल्पवयीन मुलांनी दुरुस्तीसाठी आलेल्या दुचाकीचे इंजिन व पाने, असा सुमारे २५ हजार रुपये किमतीचा माल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. हा चोरीचा माल एशियन पेट्रोल पंपासमोरील एका भंगारवाल्यास अवघ्या ७०० रुपयांना विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे अवैध भंगार व्यवसाय चोरीला थेट खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट होते.याशिवाय, एका भंगार दुकानात नामांकित कंपनीच्या नव्या बॅटऱ्या चोरीच्या मार्गाने विक्री होत असल्याची माहिती कासा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित भंगार दुकानदार गुफरान खान याच्यावर मुंबई पोलीस अधिनियम व भारतीय दंड संहितेअंतर्गत कडक कारवाई केली आहे.
तथापि, चारोटी–कासा परिसरात अजूनही अनेक अवैध भंगार दुकाने खुलेआम सुरू असल्याने पोलीस व स्थानिक प्रशासनाने व्यापक मोहीम राबवून अशा व्यवसायांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button