पालघर नगर परिषदेत भाजपकडून अॅड. जयेश आव्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड

पालघर नगर परिषदेत भाजपकडून अॅड. जयेश आव्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
पालघर : प्रतिनिधी
पालघर नगर परिषदेतील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने तसेच अनुभवी, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी देत भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्ते व कायदेतज्ज्ञ अॅड. जयेश रघुनाथ आव्हाड यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे.
गेल्या दोन दशकांहून अधिक काळ कायदा, समाजकार्य व सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या अॅड. जयेश आव्हाड यांनी पक्षाने सोपवलेल्या विविध जबाबदाऱ्या शिस्तबद्ध व पारदर्शकपणे पार पाडल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचे अर्ज नियमानुसार भरणे, निवडणूक खर्च प्रतिनिधी म्हणून काम पाहणे तसेच निवडणूकविषयक कायदेशीर बाबींचे काटेकोर नियोजन करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.
व्यवसायाने वकील व कर सल्लागार असलेले अॅड. जयेश आव्हाड हे B.Com., LL.B., G.D.C.&A., D.T.L., D.L.L. & L.W. या उच्च शैक्षणिक पात्रतेचे धारक असून, ते १९९९ पासून वकिली व कर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. २०१४ पासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या आव्हाड यांनी कायदा प्रकोष्ठ जिल्हा संयोजक म्हणून काम केले असून, सध्या ते भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय असून,
तेरोटरी क्लब ऑफ पालघर (2023–24) माजी अध्यक्ष,
आयर्न वेल्फेअर क्लब ऑफ पालघर – अध्यक्ष,
जनविकास ग्रामीण बिगरशेती पतसंस्था – संचालक,
लाडकी लेक गौरव संस्था – सचिव,
यश फाउंडेशन – सचिव,
अपंग पुनर्वसन सेवा संस्था – उपाध्यक्ष,
शिधा सेवायतन – खजिनदार,
तसेच पालघर डिस्ट्रिक्ट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते विविध संस्थांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत.
पालघर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असूनही पक्षाने अन्य उमेदवाराची निवड केल्यानंतर अॅड. आव्हाड यांनी कोणतीही नाराजी न दर्शवता पक्षनिष्ठा जपत काम सुरू ठेवले. त्यांच्या अनुभव, संयम, शिस्तबद्ध कार्यपद्धती, निष्ठा व प्रामाणिकतेची दखल घेत भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर स्वीकृत नगरसेवकपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
अॅड. जयेश आव्हाड यांची ही निवड भाजपसाठी तसेच पालघर शहराच्या विकासासाठी आशादायक मानली जात असून, आगामी काळात पालघरच्या सर्वांगीण विकासात त्यांचा मोलाचा वाटा राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.